Posts

Image
काला : 'थलैवा'स्टाईल राजकीय भाष्य -श्रीराम मोहिते रजनीकांतच्या चित्रपटांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. चित्रपटातून फार खोल जाणारा गहन विषय वगैरे न मांडता प्रेक्षकाला दोन-तीन तास एका स्वप्नमय विश्वात घेऊन जाण्याची किमया रजनीकांतचे चित्रपट साधत आले आहेत. 'थलैवा' हे नामाभिधान मिरवत रजनीकांतचे चित्रपट आपल्या बहुतांशी अतार्किक आणि अतींद्रिय वाटणाऱ्या करामतींनी एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची रंजनाची गरज भागवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. खास रजनी स्टाईल स्लो मोशन सिक्वेन्स, क्लोज अप्सचा मुक्त वापर, ३६० डिग्री शॉट्स, डोळ्याचे पारणे वगैरे फेडणारे अँक्शन सीन्स, रंगीबेरंगी कपड्यातले ठेकेदार डान्स, आणि रजनीची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' बनवणारे खुमासदार डायलॉग यामुळे रजनीकांत या प्रेक्षकवर्गाच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. काला हा पा रणजित दिग्दर्शित चित्रपट मात्र रजनीकांतच्या 'लार्जर दॅन लाईफ इमेज'ला बऱ्याच अंशी ( पूर्णपणे नव्हे) मोडीत काढत वास्तववादी आणि अधिक मानवी बनवतो. आणि महत्वाचे म्हणजे त्यापुढे जाऊन समकाळाला भिडत एक ठोस राजकीय सामाजिक भा
Image
'देहलीज़ ऊँची है ये पार करा दे'    -श्रीराम मोहिते  जगातल्या प्रत्येक माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी अतिशय प्रेम असतं. आणि ते असणं साहजिकच असतं. कितीही जग फिरलो तरीही आपल्या मुळांची ओढ सुटत नाही. भूमीविषयीच्या या आस्थेला जेव्हा एक संकुचित राजकीय अर्थ चिकटतो तेंव्हा आंधळ्या राष्ट्रवादाचा जन्म होतो. धर्म, जात, रक्त यासारखेच देश हेसुद्धा निखळ मानवी मूल्यांमधले एक कुंपण होऊन बसले की हळूहळू त्यातून एक विखारी हिंसा तयार होऊ लागते. मग युद्ध हेच सर्व राजकीय प्रश्नाचे उत्तर वाटू लागते. एकमेकांना ठेचून काढण्याची भाषा म्हणजेच देशप्रेम ठरू लागते. तलवारी,तोफा ,रणगाडे,आणि बंदुकाच मग राष्ट्रीय प्रतीके वाटू लागतात. हिंसेच्या या गदारोळात शांतता,अहिंसा ,माणसामाणसांमधील प्रेम,आस्था ,अहिंसा यांचा आग्रह एक तर दुबळेपणा ठरतो किंवा देशद्रोहच.                                        'राझी' हा मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपट राष्ट्रवाद,देशप्रेम यांच्या पलीकडे असणाऱ्या व्यापक मानवी मूल्यांचे आणि वैश्विक संबंधांचे अतिशय सूक्ष्म धागे अलवारपणे विणत जातो. राझी रूढार्थाने '

स्वत्वशोधाचा मुग्ध प्रवास : लेथ जोशी

Image
             काळ जसजसा पुढे सरकत असतो तसतसे आपला भवताल बदलत जाणे अटळ असते. काळाच्या निर्मम प्रवाहापुढे भल्याभल्या अजस्र ताकदीलाही नमावं लागतं. काळाचा अदृश्य आणि अतर्क्य प्रवाह आपल्या जगण्यात नानाविध उलथापालथी घडवून आणत असतो. बऱ्याचदा काळ जे बदल घडवून आणत असतो त्याचा बरेवाईटपणा व्यक्तिसापेक्ष असतो. म्हणजे एकासाठी मोठा वादळासारखा वाटणारा बदल दुसऱ्यासाठी कदाचित अगदी मामुली असू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या भावजीवनात या बदलांनी उडवलेली खळबळ इतरांसाठी मात्र नगण्य असू शकते; पण त्या व्यक्तीसाठी मात्र ती प्रचंड हादरवून टाकणारी असते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनातही एक अशीच अदृश्य खळबळ माजवलेली दिसते. अर्थातच या खळबळीचे स्वरूप बरचसे अंतर्गत असल्यामुळे बाहेरून तिचा परिणाम जाणवत नाही. मात्र तिने घडवून आणलेले मानसिक, वैचारिक बदल फार महत्वाचे आणि खोलवर परिणाम करणारे आहेत. आधुनिक काळात या बदलांचा वेग अगदी भोवंडून टाकणारा होता. आपली अवघी जाणीव आणि नेणिवही त्यांनी व्यापून टाकणारा होता. या प्रचंड वेगामुळे अगदी कालचे तंत्रज्ञान आज जुने होत गेले. पण जुन्या तंत्रज्ञानाशी अनेक वर्षांचे जे भावबंध घट्